Wed. Jan 22nd, 2025

Hi, Friends Here you Can Read Best {Marathi Shayari}, Marathi Shayari Love, गुलाब शायरी मराठी, Shayari Marathi Attitude, मराठी शायरी नवीन, दु:ख शायरी मराठी, मराठी शायरी प्रेमाची, मराठी शायरी संग्रह, Good Morning Shayari Marathi, {Marathi Status}, Marathi Status Love, रॉयल मराठी स्टेटस, जिद्द स्टेटस मराठी, जीवनावर मराठी स्टेटस, Marathi Status On Life, Marathi Poems, Marathi Kavita, मराठी डीपी स्टेटस, मराठी स्टेटस जीवन.
What is Marathi Shayari?
Marathi Shayari is a Short Poem in Marathi Language. Maharashtra People Read Marathi Shayari.
मराठी शायरी म्हणजे मराठी कविता. Marathi Shayari For Marathi Lovers.

{1} Best Marathi Shayari

कॉलेज मध्ये असताना,
स्वप्न मला दाखवलीस,
आणि कॉलज जीवन संपल्यावर,
दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.

Marathi Shayari
Marathi Shayari

आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात …….!

Athvani ya kahishya,
Khodkarach astat,
Tya yetat teva,
Gardit hi ekaki kartat,
Ani jeva ekaki asto,
Teva gardi kartat.

तुला भेटायला आलो तर,
मला तू दिली कलटी,
अपेक्षा करतो कि तू नाही,
घेत माझी फिरकी.
– Anky.

Tula bhetayla alo tar,
Mla tu dili kalti,
Apeksha karto ki tu nahi,
Ghet mazi firaki.

marathi shayari

आपल्याला जर आपल्या आवडत्या,
व्यक्तीमध्ये वेगळेपणा जाणवला तर,
समजून जा कि ती व्यक्ती काळानुसार बदलत आहे.

Aplyala jar aplya avdtya,
Vyktimadhye veglepan janvla tar,
Samjun ja ki ti vyakti kalanusar badlat ahe.

Good Morning Quotes Marathi Shayari :-
सकाळी उठल्यावर खूप छान वाटत,
जस काही धुकं आकाशात दाटल्यासारख वाटत,
आठवण येते तिची जेव्हा,
रोज सकाळी चहा पितो तेव्हा.
Shubh Prabhat.

मला पाहुन तू, गाल्यात ला गाल्यात हसतेस,
आणि मी बोलल्यावर माझ्यावर पटकन रूसतेस,
पण तुला चॉकलेट दिल्यावर,
पटकन माझ्या कुशीत घुसतेस,
अस कस विचित्र प्रेम तू माझ्यावर करतेस.

Mala pahuna tu, galyata la galyata hasatesa,
Aṇi mi bolalyavara majhyavar paṭakan rusatesa,
Paṇa tula cokaleṭa dilyavara,
paṭakana majhya kushit ghusatesa,
Asa kasa vichitra prema tu mazyavar karates.

marathi shayari

बंद दुकानाच्या शटर वर लिहील होत..
ऑन लाईन ऑर्डर साठी खालील नंबरवर फोन करा..
फोन केला तर सांगण्यात आल..
शटर वर करा आणि आत या.
====================================
देव जे करतो,
ते विचारपूर्वक करतो..
आता हेच बघा ना,
कान एवढे बाहेर नसते तर,
आता मास्क लावण्यासाठी,
खिळे ठोकावे लागले असते.

खूप त्रास होतो,
जेव्हा एखाद्या व्यक्तीची,
आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी,
हळू हळू बोलायची बंद होते.

Marathi Shayari
Marathi Shayari

जीवनात अपयश येणे चुकीचे नाही,
पण प्रयत्नच न करण हे मात्र चुकीचे आहे.

Birthday Wishes in Marathi For Doctor
डॉक्टर असतात देवासारखे,
ते फक्त माणूस नसतात तर,
डॉक्टर असतात देवमाणूस,
म्हणून डॉक्टरांचा बर्थडे असतो स्पेशल,
हैप्पी बर्थडे डॉक्टर.

{2} Marathi Shayari

फुलाच्या वासाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही दूर का असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही.

Happy Birthday Return Wishes in Marathi
तुला विश करायच राहिल म्हणून आलो मी रिटर्न
आणि आता तुला विश करतोय हैप्पी बर्थडे रिटर्न.

Tula wish karayaca rahila,
Mhanun alo mi return,
Ani ata tula subheccha detoy,
Vadhdivsaychya hardik subheccha.

Marathi Shayari
Marathi Shayari

डिअर पिल्लू,
आधी तुला गमवायची मनात भीती होती,
पण आता नाही, कारण मी तुझ्यावर कितीही,
प्रेम केला ना तरी तुला त्याची किंमत नाही,
तुला फक्त तुझाच गोष्टी महत्वाच्या आहेत,
तुझा गोष्टीसमोर माझ्या भावना शून्य आहेत,
हे आज समजला मला.

मरण कधी येईल माहित नाही मला,
पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते,
हृदयाच्या झटक्याने यायला हवं,
शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची.

सांज दिखावा,
मेघांची रांगोळी,
गंध केवडा,
धुंद मारवा,
दोघांच्या अंतरी,

ऐल लाजणे,
पैल छेडणे,
बोलक्या लोचनी,
मंद सरींचे,
सूर साजिरे,
देहाला भूलवी,

ऋतू ओघळे,
चिंब जाहले,
स्पर्शता थेंबांनी,
लुब्ध प्रीतीचे,
मुग्ध चांदणे,
शिंपिले अंगणी.
– स्वरा.

Marathi Shayari

स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट व्हा,
कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते,
पण रडवणारे नेहमीच भेटतात.

जेव्हा एखादी व्यक्ती,
आपल्याला खूप आवडते,
तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच,
व्यक्तीचा विचार मनात चालू असतो.

रोज पाहते मी तुझे शब्द…
कधी पुस्तकात जपलेले,
कधी कागदावर टिपलेले,
कधी मनात साठलेले,
कधी ओठात रुळलेले!

दर वेळी वाटतं कळलंय…
अगदी सोप्प आहे,
छान समजलंय,
पण तोच…
पालटू लागतो शब्दांचा अर्थ !

कल्पिताचा थांग सापडत नाही,
विचारांचे शिखर सर होत नाही,
समांतर असं काही गवसत नाही,
सगळं गाठल्याचा नुसता भास…
साध्य मात्र काहीच होत नाही !

तुझे शब्द पुढे जात राहतात,
प्रवाहात उलट सुलट वाहतात,
नवे विस्तार प्रस्थापितात,
मी मागे पळत राहते नेटाने, हट्टाने…
तुझ्या शब्दखुणा खेळवत राहतात !

मग खेळता खेळताच मर्म गवसते,
अन मी उन्मुक्त स्वैर विहरते,
मनी आनंदी आनंद लहरते,
तुझ्या शब्दांचे पैलू “वैभव”…
असे रोज नव्याने उलगडते !
– स्वरा.

Marathi Shayari

एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली,
कि दुसरीकडे कुठेच मन लागत नाही.

एक बोलू का,
आजकालच्या प्रेमामध्ये अस होत आहे,
तुम्ही ज्या व्यक्ती साठी रडत आहात,
ती व्यक्ती दुसऱ्यांना खुश ठेवणासाठी व्यस्त आहे.

वास्तवाचा स्वीकार करून,
जगण्याचा खरा आनंद आहे,
बाकीचा सगळा जगासाठी,
मांडलेला दिखावा असतो.

धुंद रातीला खुले चांदवा,
सप्तरंग मावळले,
रंग प्रीतीचा श्वेत सावळा,
अंतरंग उजळले.
– स्वरा.

अधीर मनाच्या अंगणी, ये ना जरा,
पहाट स्वप्न होऊनी, ये ना जरा!

रवी किरण लेवूनी, ये ना जरा,
उधळू रक्तीमा वनी, ये ना जरा!

श्रावण सरी ओंजळी, घे ना जरा,
चिंब सांज आठवणी, दे ना जरा!

धुंद रातीचा चंद्रमा, हो ना जरा,
शाश्वत आस उद्याची, दे ना जरा!

काळ प्रहर विसरुनी, ये ना जरा,
कवेत प्रीतीच्या संयमी, घे ना जरा!
– स्वरा.

Marathi Shayari

संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,
कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण, निघून गेलेली वेळ,
आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
तरच ते बहरते, आणि खुप काळ टिकून राहते.

काळजी घेत जा स्वतःची,
कारण या छोट्याश्या आयुष्यात,
खूप स्पेशल आहेस तू माझ्यासाठी.

Marathi Shayari

{3} Marathi Status

किंमत करा त्यांची,
जे तुमच्यावर निःस्वार्थीपणे प्रेम करतात,
कारण जगात काळजी घेणारे कमी,
आणि त्रास देणारेच जास्त असतात.

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात,
पण माणसं परत कधीच येत नाही.

जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ देऊ नका,
एक अन्नाचा कण,
आणि दुसरा आनंदाचा क्षण.

Marathi Shayari

स्वभाव आणि विचार चांगले ठेवावेत,
डीपी आणि स्टेटस तर सगळेच ठेवतात.

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात,
तुमच्यासारखे…….

दुसऱ्याच मन दुखवून,
मिळवलेले सुख,
कधीच आयुष्य,
सुंदर बनवू शकत नाही.

Marathi Shayari

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा आहे,
त्यातील जीव आहेस तू .

सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात,
कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.

लोक म्हणतात पहिले प्रेम विसरता येत नाही,
मग लोक आपल्या आई वडलांना कसे विसरतात…

Marathi Love Shayari For Girlfriend
अपमान होऊन पण आपण,
त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो,
यालाच खरं प्रेम म्हणतात.

Marathi Shayari

कधीच चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका,
कारण त्यांना झालेला त्रास ते बोलून नाही दाखवत,
व ते तुमच्या आनंदासाठी शांतपणे,
तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

{4} मराठी शायरी नवीन

मेसेज कधी, कसा येतो,
काय येतो हे महत्वाचे नाही
तर येतो हे महत्वाचे आहे.

स्वावलंबन करून, स्वकष्टार्जित,
तसेच नेकीने व प्रामाणिकपणे,
प्रयत्न करून कमावलेले धन,
निःसंशय सुख-समाधानकारक असते,
आणि जोडीस जोड परधनाची,
लालसा न ठेवल्यास अधिक उत्तम जीवन लाभते.

एकांतात फ़क्त वाईट विचार येत नाहीत,
तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर मिळतात,
स्वताला स्वताची ओळख होण्याची तीच एक वेळ असते.

Marathi Shayari

शब्द कितीही काळजीपूर्वक,
वापरले तरी,
ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे,
त्याचा अर्थ लावत असतो.

Shabd kitihi kaljipurvak vaprle tari,
Eknara aplya soyipramane tyacha,
Artha lavat asto.

मनात काय आहे ते स्पष्ट बोलावे,
न बोलता, अंतर निर्माण होण्यापेक्षा,
बोलून निर्णय घेणं कधीही चांगले.

Manat kai ahe te spashta bolave,
Na bolta, antar nirman honyapeksha,
Bolun nirnay ghen kadhihi changle.

Successful माणूस तोच होतो,
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी,
तो त्याचे सरबत करून पितो.

काही प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकते.

मला पाहिजे तशी परी आहेस तू,
Life Time मला तुझा गर्व होईल,
अशी माझी जान आहेस तू.
– Ankush.

लहान असताना मला अजिबात भाषा शिकायला आवडायच्या नाहीत. सावळा गोंधळ होता सगळ्याच भाषांचा डोक्यात. हिंदीतलं मराठीत, मराठीतलं हिंदीत हे ठरलेलं असायचं आणि त्यावर इंग्लिशची खमंग फोडणी असायचीच! लिहिण्याची ही तऱ्हा तर बोलणं अजूनच मजेशीर. ‘हे करणे योग्य आहे’ ‘हे वाचणे योग्य आहे’ अश्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सहज योग्य होऊन जायच्या. अर्थात ही सवय अजूनही आहेच! पण या सगळ्याला उचित म्हणायच्या सवयी मुळेच कदाचित एक वेगळी ‘Ability’ ‘योग्यता’ खरंच हळूहळू निर्माण होऊ लागली माझ्यात, विचार लिहून मांडण्याची! अर्थात मला फार छान व्याकरणाला धरून, वृत्तबद्ध, छंदबद्ध वगैरे लिहिता येत नाही हे मान्यच आहे मला, पण मनात आलेलं शब्दबद्ध करता येऊ लागलं आहे हे निश्चित. एकाच भाषेतही लिहिता येत नाही. तिन्ही भाषांत मुक्त मुशाफिरी चालू असते माझी.

एक गोष्ट अगदी माझ्या मनाच्या जवळची आहे …’I Write to Express, Not to Impress!’ हा आता माझ्या एक्स्प्रेशन वर कोणी इंप्रेस होत असेल तर माझी त्यांना ना नाही, या आधी कधी नव्हती आणि आणि या पुढेही कधी नसेल! After all, मैं खुद की Favorite हूँ! अगर आपकी भी हूँ then its Cool!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *